समुद्राची लाट, विकासाची वाट – ग्रामपंचायत कर्दे

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १६. १२. १९५६

आमचे गाव

कोकण किनारपट्टीवरील निसर्गसंपन्न ग्रामपंचायत कर्दे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे वसलेले एक सुंदर व शांत गाव आहे. निळ्याशार समुद्रकिनारा, हिरवीगार डोंगररांग, सुपीक जमीन आणि स्वच्छ वातावरण ही कर्दे गावाची प्रमुख ओळख आहे. समुद्र, शेती आणि पर्यटन यांचा समतोल साधत कर्दे गावाने विकासाची वाटचाल सुरू ठेवली आहे.

या गावातील ग्रामस्थ कष्टकरी, एकजुटीचे व निसर्गाशी घट्ट नाळ जपणारे आहेत. शेती, फळबागा, मासेमारी तसेच पर्यटन हे येथील मुख्य उपजीविकेचे स्रोत आहेत. पारंपरिक संस्कृती, सण-उत्सव आणि लोकजीवन आजही जपले जाते.

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, शिक्षण व मूलभूत सुविधा यावर भर देत ग्रामपंचायत कर्दे शाश्वत विकासाच्या दिशेने कार्यरत आहे. लोकसहभागातून पारदर्शक प्रशासन, हरित गाव आणि समृद्ध भविष्य घडविण्याचा निर्धार ग्रामपंचायत कर्देने केला आहे.

७२९
हेक्टर

४९०

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत कर्दे,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

१२५०

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज